breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

शासकीय वसतिगृहात मुलींचा लैंगिक छळ ; वसतिगृह अधिक्षकास अटक

पंढरपूर – पंढरपुर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्‍यार्थींनींचा कार्यालयात बोलवून लैंगिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वसतिगृह अधीक्षक संतोष प्रभाकर देशपांडे (वय ५३, रा. गुरुकृपा सोसायटी, चैतन्य नगर, पंढरपूर) याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.

पंढरपूर पोलिस विभागाच्या निर्भया पथकाचे पोलिस उपनिरीक्षक गजानन गजभारे व उपनिरीक्षक प्रिती जाधव यांच्या पथकाने वसतिगृहास भेट दिल्यावेळी हा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी वसतिगृह अधीक्षक संतोष  देशपांडेच्याविषयी अनेक विद्‍यार्थीनींनी तक्रारी केल्या. देशपांडे हा मुलींना विविध कारणांनी कार्यालयात एकटे बोलावून त्यांच्यासोबत अश्लिल वर्तन करत असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे. सोमवारी पहाटे १ वाजता संतोष देशपांडेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपअधीक्षक अनिकेत भारती करत आहेत.

दरम्यान, शासकीय वसतिगृहातील मुलींच्‍या रुममध्ये त्‍या एकट्या असताना वसतिगृहाचे अधीक्षक संतोष देशपांडे प्रवेश करतात. ई-मेलचे कारण सांगत कार्यालयात बोलावून अश्‍लिल चाळे करतात, अशा तक्रारी मुलींनी केल्यानंतर शहर पोलिसात मंगळवारी रात्री १० वाजण्‍याच्या सुमारास संतोष देशपांडे विरोधात अनु. जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह ३५४, ३६४ सह विविध कलमानुसार देशपांडे यास मंगळवारी पहाटे १ वाजता अटक करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button