शाळा-महाविद्यालयांसमोरील टवाळखोरांवर पोलिसांचा ‘वाॅच’
सलग दुस-या दिवशी 35 रोडरोमिआेंवर कारवाई
पिंपरी ( महा ई न्यूज ) – शाळा-महाविद्यालयांसमोर विनाकारण थांबून टवाळखोरी करणा-या तरुणावर पिंपरी पोलिसांनी आज (गुरुवारी) कारवाई करण्यात आली. सलग दोन दिवस केलेल्या धरपकडीत एकूण 77 तरुणांवर कारवाई करण्यात आली. त्या रोडरोमिओंना ताब्यात घेवून मुंबई पोलीस कायद्यान्वये सक्त ताकीद देवून कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरी पोलिसांनी गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत संत तुकाराम नगर डाॅ.डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रतिभा महाविद्यालय मोहननगर, जयहिंद काॅलेज पिंपरी याठिकाणी विनाकारण घुटमळणा-या 35 तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांचा महाविद्यालयांमध्ये प्रवेश नसल्याचे आढळले. त्यावरून सर्व तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांसमोर त्यांना समज देऊन सोडण्यात आले. तसेच ताब्यात घेतलेल्या तरुणांकडे आढळलेल्या 33 वाहनांची यादी तयार करून पिंपरी वाहतूक विभागाकडे देण्यात आली आहे. वाहतूक विभागाकडून संबंधित वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, रामदास मुंढे, वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक उत्कर्षा देशमुख, पोलीस कर्मचारी पठाण, नीलकंठ, ठोंगिरे, यादव, गुजर, खाडे, भोसले, वाव्हळ, पोलीस नाईक ढवळे, हगवणे, ओझरकर, करचुंडे, पोटकुले, झनकर, आंबे, घाडगे, जाधव, विधाते, महिला पोलीस कर्मचारी गायकवाड, पिल्ले, बिर्जे, गोलंदाज, निकम, पिसे, येवले, चौधरी, मोमीन, रहाणे यांच्या पथकाने केली.