breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करुन वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करावेत

आमदार लक्ष्मण जगताप यांचे कार्यकर्त्यांना आवाहन 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पुलवामा येथे दहशतवाद्यांनी गुरूवारी (दि.१४) केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला.  तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि.१५) कोणतेही कार्यक्रम करू नयेत. शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करुन सर्व कार्यक्रम रद्द करावेत, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे. 

आमदार जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्याला गुरूवारी दुपारी लक्ष्य केले. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. तसेच अनेक जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.

या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर सहभागी आहे. आपल्या शहिद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याने शुक्रवारी (दि. १५) माझा वाढदिवस साजरा करू नये. वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचे नियोजन केलेले असेल, तर शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून सर्व कार्यक्रम रद्द करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button