breaking-newsपुणेमहाराष्ट्र

शहर परिसरात पावसाची संततधार

पुणे – गेले काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळच्या सुमारास पुणे शहरात हजेरी लावली.
ऑगस्टच्या सुरूवातीपासून शहरात पावसाने दडी मारली होती. पण, सकाळपासून पावसाची भुरभूर सुरू होती. सायंकाळी मात्र पावसाची जोरदार सरी कोसळल्या. शहरात पाऊस नसला, तरी ढगाळ वातावरण मात्र रोज आहे. पावसाने सध्या राज्यात सर्वत्रच उघडीप घेतली आहे.

पावसाचा जोर हा आणखी काही दिवस मंदावणार आहे. हवामान शास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यात कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचीा शक्‍यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी कोसळतील.

पुणे शहरात येत्या चोवीस तासांत पावसाच्या एक ते दोन सरी कोसळण्याची शक्‍यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button