breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात सुमारे 20 कोटींच्या विकास कामांना मंजूरी ; स्थायी समितीचा निर्णय

पिंपरी- शहरातील विविध विकास कामे करण्यासाठी सुमारे 19 कोटी 87 लाख 49 हजार रुपयांच्या खर्चास आज (बुधवारी) स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली, अशी माहिती विलास मडेगिरी यांनी दिली. या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.  तसेच यावेळी पी.सी.एम.टी चे माजी सभापती सुरेश चोंधे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

महापालिकेच्या सन 2018-19 चे अंदाजपत्रकात पीएमपीएमएल निधी या लेखाशिर्षावर १६४ कोटी ५६ लाख रुपये तरतूद करणेत आली असून यामध्ये संचलनतूट 81.56 कोटी विविध प्रकारचे पासेस २३ कोटी व बसेस खरेदी 60 कोटी असा अपेक्षित खर्च ग्रहीत धरण्यात आलेला आहे. या रक्कमेतून प्रतीमहा सहा कोटी रुपये संचलनतूट व सवलतीचे पासेस पोटी 1.50 कोटी रुपये असे एकूण सात कोटी पन्नास लाख रुपये माहे एप्रिल 2018 ते फेब्रुवारी 2019 अखेर 11 महिने अग्रीम स्वरुपात अदा करण्यास मान्यता देण्यात आली.

झेप पुनर्वसन केंद्र चिंचवड या मतिमंद व गतिमंद मुलांसाठी प्रशिक्षण व विविध प्रकारच्या थेरपी देणा-या संस्थेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जागा वापरासाठी 3 वर्षे कालावधी करिता नाममात्र भाडयाने देण्याची शिफारस करुन अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव महासभेकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

संत  तुकारामनगर मधील वाय.सी. एम हॉस्पिटल मधील आय.सी.यू.शस्त्रक्रीया कक्षाची उर्वरित कामे करण्यासाठी येणा-या एक कोटी 2 लाख 87हजार 492 रुपयांच्या खर्चास, प्राधिकरण हद्दीतील पेठ क्र. 32 रावेत येथे वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणेसह गॅसवर आधारित आधुनिक शवदाहिनी सह स्मशानभुमी विकसीत करण्यासाठी येणा-या सुमारे चार कोटी 79 लाख 33 हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र. 44 आणि 45 मध्ये जुन्या पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी येणा-या सुमारे 24 लाख 58 हजार 184 रुपयांच्या खर्चासह या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button