breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

शहरात सव्वाचार लाख विद्यार्थ्यांना गोवर-रुबेला लसीकरण मोहीम

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातंर्गत गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार महापालिका आरोग्य वैद्यकीय विभागाने 6 लाख 16 हजार 193 उदिष्टापैकी 4 लाख 34 हजार 234 विद्यार्थ्यांना गोवर-रुबेला लसीकरण करण्यात आले.  

पिंपरी-चिंचवड महानगरपलिकेच्या वैद्यकिय विभागांतर्गत गोवर रुबेला लसीकरण मोहिम २७ नोव्हेंबर २०१८ पासून राबविणेत येत आहे. सार्वजनिक आरोग्यामध्ये गोवर लसीकरण हे एक प्रभावी साधन ठरले आहे. गोवर रुबेला लसीकरण मोहिमेसाठी लाभार्थी हे ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालके/विद्यार्थी आहेत. ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील जास्तीत जास्त/अधिकतम बालक व विद्यार्थ्यां पर्यंत सर्व मनपा व खाजगी शाळा, अंगणवाडी, बालवाडी, नर्सरी, प्लेग्रुप मार्फत पोहचणे सहज शक्य होणार आहे.

महानगरपालिका हद्दीतील सर्व मनपा व खाजगी शाळा, अंगणवाडी, बालवाडी, नर्सरी, प्लेग्रुप या एकुण १२०० ठिकाणी लसीकरण मोहिम सुरु आहे. शासनाकडून महापालिकेस या मोहिमेअंतर्गत ६,१६,१९३ उदिष्ट देण्यात आलेले असून आज पर्यंत ४,३४,२३४ उदिष्ट पुर्ण झालेले आहे. सदरचे उदिष्टय पुर्ण करण्यासाठी मा.महापौर, मा.आयुक्त व मा.अतिरिक्त आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली महापालिका विविध विभाग, वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग, रोटरी क्लब, लायन्स क्लब, इंडियन मेडिकल असोशिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन, पिंपरी चिंचवड डॉक्टर असोशिएशन, खाजगी बालरोगतज्ञ, पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषद, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, अंगणवाडी सेविका इ.व्यक्ती व संस्था यांनी मोलाची कामगिरी बजाविली आहे.

या मोहिमेचा अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांचे अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेस अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ.पवन साळवे, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ.वर्षा डांगे, डॉ.तृप्ती सागळे, शिक्षणाधिकारी पराग मुंढे, प्रभारी वैद्यकिय अधिकारी रुग्णालय डॉ.शैलजा भावसार, डॉ.एस.एम.शिंदे, डॉ.पी.एच.ताडे, डॉ.संगिता तिरुमणी, डॉ.विणादेवी गंभीर, डॉ.सुनिता इंजिनिअर, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.बिपिन डिंबळे उपस्थित होते.

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळांमध्ये लसीकरण मोहिम चालू असून महापालिकेच्या ३४ रुग्णालये व दवाखाने यामध्ये गोबर रुबेला लसीकरणासाठी विशेष बुथ स्थापन करण्यात आलेले आहेत. तसेच महापालिका कार्यक्षेत्रातील अंगणवाडी, बालवाडी, बांधकामे, विटभट्टया इ. ठिकाणी बाहयसंपर्क सत्रे आयोजित करण्यात आलेली असून या बाबतची माहिती नजिकच्या महापालिकेच्या रुग्णालये व दवाखाने या ठिकाणी प्रसिध्द करणेत आलेली आहे.

गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत आज अखेर पर्यंत यशस्वी करण्यासाठी ज्या खाजगी संस्था, अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्था यांची सक्रिय सहभाग घेतला त्या सर्वांचे महापालिकेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत. तसेच महापालिकेकडून आवाहन करण्यात येते की, ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ज्या बालकांचे गोवर रुबेला लसीकरण माहिमेतंर्गत लसीकरण राहिलेले आहे त्यांनी महापालिकेच्या रुग्णालय, दवाखाना अथवा बाहयसंपर्क सत्रांचे ठिकाणी लसीकरण करुन घ्यावे व मोहिम शंभर टक्के यशस्वी करण्यास सहकार्य करावे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button