शहरात प्लाॅस्टीक पिशव्या वापर करणा-यावर दंडात्मक कारवाई
पिंपरी – महापालिकेतर्फे प्लॉस्टीक कॅरीबॅगचे उत्पादन, साठा, विक्री आणि वापर करण्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याअंतर्गत गेल्या दोन महिन्यात आठ क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत प्लास्टिकचा वापर करणा-यांकडून तब्बल एक लाख 45 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक 45 हजार रुपये ‘फ’ क्षेत्रिय कार्यालया मार्फत दंड वसूल करण्यात आला आहे. तर, मंडई, फेरीवाले, दुकानदारांकडून 2190 किलो ग्रँम प्लॉस्टिक कॅरीबँग जप्त करण्यात आल्या आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
शहरात प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, कप, प्लेट्स, बाटल्या इत्यादींच्या उत्पादनासह वापरावर पूर्णपणे बंदी असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्याची अंमलबजावणी सुरु केली. पालिकेच्या आठही क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत प्लॉस्टिक न वापरण्यासाठी जनजागृती करण्यात आली. प्लॉस्टिक, थर्माकॉल वापरणा-यांविरोधात दंडात्मक कारवाई केली. 23 मार्च ते 1 जून आजअखेरपर्यंत प्लॉस्टिकचा वापर करणा-यांकडून तब्बल एक लाख 45 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
त्यामध्ये ‘अ’ क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत 10 हजार, ‘ब’ 15 हजार, ‘क’ दहा हजार, ‘ड’ दहा हजार, ‘इ’ 30 हजार, ‘फ’ 45 हजार, ‘ग’ 20 हजार, ‘ह’ पाच असा एक लाख 45 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक 45 हजार रुपये ‘फ’ क्षेत्रिय कार्यालया मार्फत दंड वसूल करण्यात आला आहे. तर, ‘ह’ कार्यालयाअंतर्गत सर्वाधिक कमी पचा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर, मंडई, फेरीवाले, दुकानदारांकडून 2190 किलो ग्रँम प्लॉस्टिक कॅरीबँग जप्त करण्यात आल्या आहेत. प्लॉस्टिक वापरणा-यांकडून 5 ते 25 हजार रुपयांपर्यंत दंड वसूल केला जात आहे.