breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात गोवर व रुबेला लसीकरण मोहीम राबविणार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – केंद्र सरकारकडून गोवर व रुबेला लसीकरण मोहिम देशभर सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाद्वारे या मोहिमेला सुरूवात करण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबरपासून याची सुरूवात करण्यात येणार आहे. शहरातील ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील ६ लाख १६ हजार मुलांना ही लस देण्याचे उद्दिष्ट्ये असल्याची माहिती वैद्यकीय विभागाच्या वतीने वायसीएम रुग्णालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहायक आयुक्त आण्णा बोदडे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ. चेतन खाडे आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरात या आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून व केंद्र शासनाच्या मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानूसार वैद्यकीय विभागाचे कर्मचारी शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन ९ महिन्यांपासून ते १५ वर्ष वयोगटातील मुलांना लसीकरण करणार आहे. पाच आठवडे ही मोहिम चालणार आहे. लसीकरण सर्वांना मोफत असणार आहे. १२०० पेक्षा अधिक संस्थांमध्ये जाऊन हे लसीकरण केले जाणार आहे. यासाठी मुलांच्या पालकांना देखील बोलाविले जाणार आहे. प्रशिक्षीत परिचारिकांकडून हे लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणानंतर मुलांना सर्टिफिकेट दिले जाणार आहे. या बरोबरच विविध खासगी ठिकाणी, बांधकामाच्या ठिकाणी असणार्‍या मुलांना देखील लस दिली जाणार आहे. शहरातील ६ लाख १६ हजार विद्यार्थ्यांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती या वेळी वैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात आली. यासाठी २०० मुलांना एक टीम कार्यरत राहणार आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना लस द्यावी, असे आवाहन डॉ. पवन साळवे यांनी केले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button