breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील साडेसहा हजार लाभार्थ्यांना साडेतीन कोटींचा आर्थिक लाभ

  • नागरवस्ती विकास योजना विभागाचा पुढाकार
  • कल्याणकारी योजनांचा नागरिकांना दिला प्रत्यक्ष लाभ

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या मागासवर्गीय कल्याणकारी योजनांचा मागील २०१८-१९ या आर्थिक वर्षात समारे साडेसहा हजार लाभार्थ्यांना फायदा झाला आहे. महापालिकेच्या तिजोरीतील प्रशिक्षण, शिक्षणासाठी अर्थसहाय्य अशा विविध योजनांवर लाभार्थ्यांसाठी सुमारे ३ कोटी ६५ लाखांचा खर्च करण्यात आला आहे.

  • नागरवस्ती विकास योजना विभागाकडून मागासवर्गीय, महिला, अपंग आणि इतर घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यापैकी शहरातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी मागासवर्गीय कल्याणकारी योजना आहेत. त्यामध्ये युवकांना संगणक प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य, सायकल वाटप, प्रबोधनपर कार्यक्रम अशा विविध योजनांचाच त्यात समावेश आहे.

या योजनासाठी मागील २०१८-१९ या वर्षाच्या अर्थसंकल्पात सुरुवातीला ४ कोटी ७८ लाख ७५ हजार रुपयांची तरतूद केली होती. नंतर ती वाढवून ५ कोटी २८ लाख ७५ हजार करण्यात आली. या योजनेसाठी वर्षभरात आलेल्या योजनांपैकी पात्र ठरलेल्या ६ हजार ५५१ लाभार्थ्यांना थेट लाभ नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत देण्यात आला आहे. प्राप्त अर्जांपैकी लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण ७६.२८ टक्के इतके आहे. मागास कल्याणकारी योजनांवरील लाभार्थ्यांसाठी एकूण ३ कोटी ६५ लाख १९ हजार ८९२ रुपयांचा खर्च झाला आहे.

  • उच्च शिक्षितांच्या संख्येत घसरण
  • सर्वाधिक पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना माता रमाई आंबेडकर शिष्यवृत्ती दिली जाते. या दोन्ही योजनांचा मिळून सर्वाधिक ५ हजार ५२१ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. तर, सर्वांत कमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेत परदेशातील उच्च शिक्षणासाठी आर्थिक लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घसरली असून दोनच विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. व्यवसाय प्रशिक्षणाचा ४४, बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्याचा लाभ ४१ जणांनी घेतला आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button