breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील गुन्हेगारी व मुलींवरील अत्याचार थोपविण्यासाठी बुद्धीजीवींची संवेदना जागृती रॅली

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी व लहान मुलींवर झालेल्या अत्याचारा संदर्भात पिंपरी चिंचवड शहरातील बुद्धीजीवी वर्गाने संवेदना जागृती रॅलीचे आज आयोजन केले होते. यावेळी विविध संघटनांच्या वतीने पोलिस उपायुक्त ढाकणे यांना निवेदन देत या प्रश्‍नासंदर्भात शहरातील बुद्धीजीवी वर्ग आपल्या सोबत समाज प्रबोधनाच्या कार्यात सहभागी राहिल असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
माझे शहर, माझा अभिमान या अभियानामार्फत या संवेदना जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अभियान मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ‘पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात शहरातील बुद्धीवादी वर्ग चिंता व्यक्त करत आहे.  आज घट स्थापणेचा दिवस आहे. या दिवशी आपण नव्याने अंकुरीत झालेल्या सृष्टीची पूजा करत असतो. अशा नव्याने अंकुरणार्‍या सृष्टेचे पूजक असलेले आपण कोवळ्या कळ्यांना कसे कुस्करू शकतो हे आपल्या संस्कृतीला लांच्छनास्पद असून आपण ज्या संस्कृतीचे गोडवे गातो ती अशी अत्याचारी नाही.हा संदेश शहरातील सर्व घटकांपर्यंत जावा हा या संवेदना रॅलीचा मुख्य हेतू आहे. ही रॅली म्हणजे आंदोलन, निषेध, मोर्चा असे नसून शहरातील प्रत्येकाच्या संवेदना जागृत करण्यासाठीची मुक रॅली आहे. शहराच्या या गंभीर प्रश्‍नासंदर्भात पोलिसांना काही मदत हवी असेल तरी ती शहरातील एक सुज्ञ नागरिक म्हणुन करण्यास आम्ही तयार आहोत. हे माझे शहर आहे व या शहराचा मला अभिमान राहिल यासाठी आम्ही सर्वोतोपरी सहकार्यास तयार असल्याचे अभिवचन आपणांस देत आहोत.’ या रॅलीत विविध सामाजिक संघटना, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक, महिला, मुली मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button