breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई

पिंपरी – शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सध्या अनधिकृत बांधकामे, होर्डिंग्ज, जाहिरात फलक आणि अतिक्रमणांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कारवाई सुरू आहे. महापालिकेकडून शनिवारी (दि.30) तळवडेतील बांधकामांवर व निगडीत अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात आली. 
महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभागाने तळवडे रुपीनगर व ताम्हाणे वस्ती येथील दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. ही कारवाई सहशहर अभियंता, संबंधित कार्यकारी अभियंता, 1 उपअभियंता, 2 कनिष्ठ अभियंता, 8 बीट निरीक्षक, अतिक्रमण पथक, तसेच 10 पालिका पोलिस, 1 जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.  त्याच बरोबर अ प्रभाग कार्यालयाच्या जवळील अनधिकृत फलकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या परिसरातील एकुण 15 फ्लेक्स महापालिका प्रशासनाने काढले आहेत. त्यात अनेक खासगी क्लासेस, हॉटेल, शुभेच्छांच्या फलकांचा समावेश होता.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button