breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरीरसुखासाठी महिलेकडून छळ होत असल्याने युवकाची आत्महत्या

परभणी: एका तरुणाने महिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याने होणा-या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सचिन मिटकरी असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. परभणी-वसमत रोडवरील ब्रम्हा अपार्टमेंटमध्ये तो राहत होता. रविवारी रात्री गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. महिला सतत आपल्याकडे शरीरसुखाची मागणी करायची त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे युवकाने चिठ्ठीत लिहिले आहे. या महिलेचे आणखी दोन-तीन युवकांसोबत अनैतिक संबंध असल्याचेही त्याने या चिठ्ठीत नमूद केले आहे. या महिलेने आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला असून या सर्व प्रकारला कंटाळूनच आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत म्हटले आहे. या महिलेने पाच दिवसांपूर्वी युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button