breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शरद पवार माढ्यातून लढणार; मोहिते-पाटील, देशमुखांचा हिरमोड

पुणे – माढा लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी अशी पक्षातील नेत्यांची इच्छा आहे. पक्षातील नेत्यांच्या मागणीवर मी विचार करेन, असे सांगत लोकसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  दिले.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बारामती हॉस्टेल येथे बैठक शुक्रवारी दुपारी पार पडली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, खासदार विजयसिंह मोहिते- पाटील आदी नेते उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना पवारांनी हे वक्तव्य केले.

शरद पवार म्हणाले की, लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय मी पूर्वीच जाहीर केला आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक लढविण्याची माझी इच्छा नाही. मात्र, मी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असी पक्षातील नेत्यांची इच्छा आहे. खुद्द विजयसिंह मोहिते- पाटील यांनीही तशी मागणी केली. आम्ही तुमचे सर्वच निर्णय पाळतो, ऐकतो. आता आम्हा सर्वांची इच्छा तुम्ही ऐकावी असे या नेत्यांनी सांगितले. त्यावर मी अजून निर्णय घेतलेला नाही. पण पक्षातील नेत्यांच्या मागणीचा मी विचार करेन, अशी भूमिका पवारांनी पत्रकारांसमोर मांडली.

शरद पवार यांनी 2009 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भाजप नेते सुभाष देशमुख यांचा त्यांनी सुमारे तीन लाख मतांनी पराभव केला होता. तर 2014 मध्ये पवारांनी राज्यसभेत जाणे पसंत केले होते. पवारांची राज्यसभेची मुदत एप्रिल 2020 मध्ये संपत आहे.

शरद पवार यांनी 2014 सालीच आपण यापुढे जनतेतून निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले होते. तसेच आपण पहिल्यांदाच आणि शेवटचेच राज्यसभेवर निवडून जात आहोत असे स्पष्ट केले. 2020 नंतर आपण सक्रिय राजकारणातून थोडेसे बाजूला होऊन पूर्णवेळ समाजकारणात काम करणार असल्याचे पवारांनी अनेकदा स्पष्ट केले होते. मात्र, आता पक्षातील नेत्यांखातर पवार पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे विजयसिंह मोहिते- पाटलांसह प्रभाकर देशमुख यांचा हिरमोड होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button