breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरद पवार माढा लोकसभा लढविणार

मुंबई – लोकसभेच्या आगामी निवडणुकीत एकेक जागा महत्त्वाची असल्यामुळे गटबाजीच्या राजकारणात पराभवाचा चटका बसू नये, यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार स्वत: लोकसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्याच्या (ता. १४) बैठकीत यावर शिक्‍कामोर्तब केले जाण्याची शक्‍यता आहे.

माढा या लोकसभा मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’ला हमखास विजयाची खात्री आहे. मात्र, विद्यमान खासदार विजयसिंह (दादा) मोहिते पाटील व ‘राष्ट्रवादी’चे स्थानिक नेते संजय (मामा) शिंदे यांच्यात कमालीची गटबाजी आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास संजय शिंदे बंड करण्याची भीती आहे. त्यामुळे, या स्थानिक नेत्यांमधील गटबाजी रोखण्यासाठी शरद पवार यांनाच मैदानात उतरवण्याची रणनीती ‘राष्ट्रवादी’ने आखल्याचे मानले जाते.

माढा लोकसभेची जागा शरद पवार यांनी लढवावी, अशी आमची मागणी असल्याचे ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज स्पष्ट केले. शरद पवार यांनी उद्या ‘राष्ट्रवादी’च्या प्रमुख नेत्यांची सकाळी ११ वाजता बैठक बोलावली आहे. त्यात पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभेला उमेदवार व्हावे, यावर चर्चा होण्याचे संकेत आहेत. त्याबरोबरच काँग्रेस सोबतच्या जागावाटपाचे सूत्र अंतिम होणार असून, प्रचाराची रणनीतीदेखील आखली जाणार आहे.

शरद पवार माढा लोकसभेतून उमेदवार राहणार असतील, तर नाशिकमधून छगन भुजबळ, ठाणे येथून गणेश नाईक, शिरूरमधून दिलीप वळसे पाटील यांना उमेदवार म्हणून उतरवले जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button