breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानानंतर पार्थ पवारांचा व्हिडिओ काॅन्फरन्समधून काढता पाय

  • मला माहिती आहे तुम्ही काय विचारणार – पार्थ पवार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मावळ लोकसभेतील बूथ प्रमुखाशी व्हिडिओ काॅन्फरन्स द्वारे संवाद साधला. याप्रसंगी एका कार्यकर्त्यांनी पार्थला शंभर टक्के निवडून आणू असं म्हणाले, त्या कार्यकर्त्याला पवार साहेबानी मध्येच थांबवत, अजून मावळमधील उमेदवार जाहीर झाला असला तरी पक्षाकडून अधिकृत यादी अजून जाहीर व्हायची, नेमकं उमेदवार कोण असतील ते पक्षाचे अध्यक्ष जाहीर करतील, असं शरद पवारांनी सांगितले. यावेळी पार्थ पवार स्वतः उपस्थित होते. 

मावळ लोकसभा मतदार संघातील बुथप्रमुखांसोबत शरद पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारच्या आश्वासनांवर पवार यांनी टिका केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या शिबिरात मावळमधून पार्थ यांचं नाव जाहीर झालं असलं तरी उमेदवारांची यादी अजून जाहीर व्हायची आहे, असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे ह्या शिबिराला पार्थ स्वतः उपस्थित होते. पवारांनी केलेले हे वक्तव्य एकूण पार्थने लगेचच शिबिरातून काढता पाय घेतला. त्यावेळी पार्थ पवारांनी मीडियाच्या प्रतिनिधींना मला माहिती आहे तुम्ही काय विचारणार असं म्हणत बोलणं टाळलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button