breaking-newsराष्ट्रिय

व्हॉट्सअॅपला टक्कर देण्याआधीच पतंजलीचं ‘किंभो अॅप’ डाऊन

दोन वेळा लाँच केल्यानंतरही अपयशी ठरलेलं किंभो अॅप नव्याने लाँच करण्याची योजना पतंजलीने रद्द केली आहे. व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठीच पतंजलीने किंभो अॅप बाजारात आणण्याची तयारी केली होती. मात्र दोन वेळा लाँच करुनही त्यांना वाईट पद्धतीने अपयश आलं. हे मेसेजिंग अॅप लाँच करण्यामागे अदिती कमल याचा मुख्य सहभाग होता. मात्र त्यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर पतंजलीने नोएडामधील अॅप मेकिंग कंपनी सोशल रेव्ह्युलूशन मीडिया अॅण्ड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडसोबत हातमिळवणी केली होती.

द प्रिंटने दिलेल्या वृत्तानुसार, मे आणि ऑगस्टमध्ये किंभो अॅपचं लाँचिंग करण्यात आलं होतं. मात्र सुरक्षा तज्ञांवर प्रभाव पाडण्यास अॅप अपयशी ठरलं होतं. ‘आम्हाला तांत्रिकदृष्या अत्यंत सक्षम अॅप हवं होतं. मात्र आम्ही जे अॅप समोर आलं आहे त्याच्यावर समाधानी नाही आहोत. त्यामुळेच आम्ही हे अॅप लाँच करण्याची योजना रद्द केला आहे’, अशी माहिती पतंजलीचे सह-संस्थापक आचार्य बालकृष्ण यांनी दिली आहे.

‘सध्या आम्ही अनेक नव्या प्रोजक्ट्समध्ये व्यस्त आहोत. यापुढे किंभोला वेळ देण्यासाठी तसच त्याच्यावर पैसे खर्च करणं आम्हाला शक्य होणार नाही. त्यामुळे सध्या तरी किंभो अॅपची संकल्पना आम्ही बाजूला सारली आहे’, असंही आचार्य बालकृष्ण यांनी सांगितलं आहे.

सर्वप्रथम मे महिन्यामध्ये हे अॅप लॉन्च करण्यात आलं होतं. पण अॅप लॉन्च झाल्याच्या एका दिवसानंतरच किंभो वादात सापडलं. युजर्सना अॅपमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, तसंच यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनाने काही उपाययोजना समोर नसल्याचंही समोर आलं होतं. त्यानंतर हे अॅप प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आलं होतं.

सध्या बाजारात असलेल्या व्हॉटसअॅप या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅप्लिकेशनला टक्कर देण्यासाठी हे अॅप तयार करण्यात आले होते. किंभो याचा संस्कृत अर्थ आहे एखाद्याची चौकशी किंवा विचारपूस करणे. याचा अर्थ इंग्रजीमधील हॅलो, हाऊ आर यु किंवा व्हॉटस अप यासारखाच आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button