breaking-newsआंतरराष्टीय

व्हेनेन्झुएलाच्या राष्ट्रपतींवर भाषणादरम्यान ड्रोन हल्ला

  • हल्ल्यामागे अमेरिका-कोलंबियाचा हात – मादुरो 
हा हल्ला माझी हत्या करण्यासाठी केला होता. त्यांनी आज मला मारुन टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्यामागे शेजारील देश कोलंबिया आणि अमेरिकेतील अज्ञातांचा हात आहे, असा आरोप मादुरो यांनी केला आहे. दरम्यान, अमेरिकेने या आरोपांवर मौन बाळगले असून कोलंबियाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. दुसरीकडे, व्हेनेझुएलाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामागे विरोधी पक्षाच्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. 
काराकस (व्हेनेन्झुएला): व्हेनेन्झुलेलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्यावर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. राष्ट्रपती निकोलस मादुरो हे शनिवारी संध्याकाळी लष्कराच्या जवानांसमोर टीव्हीवर थेट भाषण देत असताना हा हल्ला करण्यात आला. विस्फोटके भरलेल्या ड्रोनच्या हल्ल्यातून राष्ट्रपती निकोलस मादुरो हे बालबाल वाचले आहेत. मात्र 7 जवान जखमी झाले आहेत.
ड्रोनमध्ये स्फोटके भरुन राष्ट्रपतींना लक्ष्य करण्याच्या दृष्टीनेच हा हल्ला करण्यात आला होता. पण फायर फायटर्सने हा प्रयत्न हाणून पाडला. पण या हल्ल्यामुळे कार्यक्रमाच्या आसपास असलेल्या नागरिकांच्या घराच्या काचाही फुटल्या. हल्ल्यानंतर घटनास्थळी आग लागल्याने सारा गोंधळ उडाला. मात्र, आग विझवण्याच्या बंबांनी तातडीने आग आटोक्‍यात आणली.
राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी या हल्ल्यामागे परकीय शक्तींचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी कोलंबियामधील काही गटांचा हात असल्याचा आरोप करत कोलंबियाचे राष्ट्रपती जुआन मॅन्युअल सॅंतोस यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.
या हल्ल्याचे जबाबदारी एका रहस्यमय बंडखोर गटाने स्वीकारल्याची माहिती सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे देण्यात आलेली आहे. “”हा हल्ला राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना दिलेल्या लष्करी सन्मानाव्या विरोधात असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. संविधानाचा विसर पडलेल्या आणि श्रीमंत बनण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रात ढवळाढवळ करून ते गलिच्छ करणाऱ्या व्यक्तीला हा सन्मान देण्याच्या विरोधात हा हल्ला करण्यात आल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओही चॅनल NTN24 TV ने ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये भाषणादरम्यान राष्ट्रपती आणि त्यांची पत्नी अचानक आकाशाकडे पाहू लागतात, आणि त्यानंतर स्फोटांचा आवाज ऐकायला येतो. या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button