breaking-newsराष्ट्रिय

व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के स्लीपची मोजणी करावी – 23 विरोधी पक्षांची मागणी

व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के स्लीपची मोजणी करण्यात यावी अशी मागणी देशातील २३ पक्षांनी केली असल्याची माहिती आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. Save The Nation, Save Democracy या विषयावर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी प्रेझेंटेशन केले.

“सत्ताधारी पक्षाकडून ईडी, आयकर विभाग, सीबीआय यांचा गैरवापर होत आहे. देशातील संस्थांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जात आहे. निवडणूक आयोग देखील याला अपवाद नाही,” असा आरोपही चंद्राबाबू नायडू यांनी यावेळी केला.

आयकर विभागाकडून विरोधी पक्षांना टार्गेट केले जात आहे. निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशीनबरोबर छेडछाड होत आहे. आम्ही मागच्या अनेक दिवसापासून ईव्हीएम मशीन प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. आमच्या निदर्शनास आले आहे की, ईव्हीएम मशीन मॅनिप्युलेट केली जावू शकते. १९१ देशांपैकी फक्त १८ देशांनी ईव्हीएम यंत्रणा वापरली आहे. यातील अनेक देश विकसनशील देशात मोडतात. बॅलटिंग पॉईंट, व्हिव्हिपॅट आणि कंट्रोल युनिट असे तीन डिव्हाईस सध्या मतदानासाठी वापरल्या जात आहेत असेही नायडू म्हणाले.

व्हिव्हिपॅटसाठी ९ हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. पोलिंग ऑफिसर आणि पोलिंग बुथवरील कर्मचारी हे तांत्रिकदृष्ट्या विकसित नाहीत. शिवाय ईव्हीएम मशीनचे ऑडिट करणारे कुणीही तज्ज्ञ नाही. लोकांच्या पैशातून ९ हजार कोटी खर्च केले फक्त ५ वर्षातून एकदा वापरण्यासाठी… मत दिल्यानंतर स्लीप मिळण्यासाठी ७ सेकंद लागत आहेत. आम्ही प्रश्न विचारतोय की, एवढा वेळ का लागतो? एक ट्विटर पोल घेण्यात आला त्यात २२ टक्के लोकांनी ७ सेकंद लागल्याचे सांगितले. तर ५५ टक्के लोकांनी ४ सेकंद लागत असल्याचे सांगितले, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

जर्मनीमध्ये ईव्हीएम वापरणे हे लोकशाहीच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. अमेरिका आणि इतर विकसित देशांनी ईव्हीएम मशीन नाकारल्या आहेत. २००९, २०१४ आणि आता मी ईव्हीएम विरोधात लढा देत आहे आणि पुढेही देत राहिन असेही चंद्राबाबू नायडू यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टिडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, माजी मुख्यमंत्री व कॉग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, आपचे खासदार संजय सिंग, सीपीआयचे महेंद्र सिंग, पीसीसीचे (आयएनसी) चे व्हाईस प्रेसिडेंट शांती चौहान, तृणमुल काँग्रेसचे खासदार नजमुल हक, इंडियन युनियन मुस्लिम लीगचे खोरुम ओमर, ऑल इंडिया फॉवर्ड ब्लॉकचे जनरल सेक्रेटरी डॉ. जी. एच. फर्नांडिस, लोकतांत्रिक जनता दलाचे कपिल पाटील, डीएमकेचे खासदार टी. के. एस. इलानगोवल, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल आदी नेते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button