breaking-newsआंतरराष्टीय

वॉरेन बफे यांना त्यांच्या पैशांची चिंता…

वॉशिंग्टन: जगातील धनाढ्य व्यक्तींपैकी असणाऱ्या वॉरेन बफे यांना  आपल्याकडे असणाऱ्या पैशाचे करायचे काय असा प्रश्न सध्या पडला आहे. वॉरेन बफे यांच्याकडे 116 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे. त्याचे ते काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शनिवारी ते बर्कशायर हॅथवेच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहिले होते. येथे त्यांनी जगातील सर्वात मोठ्या काही गुंतवणूकदारांना व्यवसायासाठी टीप्स दिल्या तसेच अनेक मुद्द्यांवर त्यांनी चर्चाही केली. पण त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा मुद्दाही चर्चेत आला.

वॉरेन बफे यांच्याकडे 116 अब्ज डॉलर्स इतका पैसा असून ते 100 अब्ज डॉलर्सच्या गटात जाऊन बसणाऱ्या टीसीएस या भारतीय कंपनीला सहज खरेदी करु शकतात. इतकेच नाही तर भारतीय बँकाचे झालेले नुकसानही ते एका भरुन देऊ शकतात. भारतीय बँकांचे बुडालेले कर्ज 8 लाख 96 हजार 891 कोटी इतके आहे तर बफे यांच्याकडे 7 लाख 65 हजार 600 कोटी इतके रुपये आहेत. आता तुम्हाला वाटेल एवढा पैसा असणारा माणूस एकदम सुखात असेल त्यांना कसलीच चिंता नसेल. पण हा पैसाच त्यांच्या चिंतेचा विषय आहे. या पैशाचे काय करायचा यावर विचार करायला अजूनही बैठका घेतात, त्याचा विनियोग कसा करायचा यावर चर्चा करतात.

वॉरेन बफे गुंतवणूकदारांमध्ये हा पैसा लाभांश म्हणून वाटून टाकतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र परवाच्या बैठकीत त्यांनी असे कोणतेही संकेत दिले नाही. ते म्हणतात, माझा विश्वास पैसा गुंतवण्यावर अधिक आहे. वॉरेन बफे एक उत्तम व मोठे गुंतवणूकदार म्हणून ओळखले जातात. त्यांनी अॅपल, आयबीएमसारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button