breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

वृत्तपत्रात फोटो छापून यावेत म्हणून कधीच देवदर्शन केले नाही –  शरद पवार

पुणे – आतापर्यंत एकदाही वारीला गेलो नाही. म्हणून, मला पंढरीच्या वारीचा अनादर आहे असेही नाही. मुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना कधीही शासकीय पूजा चुकविली नाही. मात्र, वृत्तपत्रात फोटो छापून यावेत याकरिता कधीच देवदर्शन केले नाही. कारण, मला अवडंबर केलेले आवडत नाही. अशा शब्दांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

पुण्यात हभप शामसुंदर महाराज लिखित ‘उजळावया आलो वाटा’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तुकाराम महाराजांचे वंशज आणि देहू फडाचे प्रमुख बापूसाहेब महाराज देहूकर, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ चोपदार, एस. यम. जोशी, सोशालिस्ट फौंडेशनचे सचिव सुभाष वारे, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त प्रकाश परांजपे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

पुण्यात मुक्कामी असलेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी (दि. 8) दर्शन घेतले. यावर निशाना साधत शरद पवार यांनी शहा आणि फडणवीस यांना टोला लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button