breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वृक्ष संवर्धन समिती सदस्यांनी वृक्षगणनेचा मागितला लेखाजोखा, अधिका-यांची बोलती बंद

  • महापालिका मुख्य उद्यान अधिक्षकांचा भोंगळ कारभार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील सर्व वृक्षांची गणना करण्यात येत आहे. वृक्षांच्या सॅटेलाईटद्वारे गणना करण्यास तब्बल 7 कोटी रुपये स्थायी समितीने 2017 मध्ये मंजुर केले. मात्र, मागील दीड वर्षात वृक्ष गणना झाली का? त्या कामाची सध्यस्थिती काय आहे, याबाबत मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे यांना वृक्ष संवर्धन समितीत विचारणा करण्यात आली. त्यावेळी संबंधित अधिका-यांची बोलतीच बंद झाली. त्या वृक्ष गणनेचा लेखाजोखा दिल्याशिवाय पुढील कामकाज करु नये, अशा सुचना वृक्ष संवर्धन समिती सदस्यांनी दिल्या. त्यामुळे सॅटेलाईट वृक्ष गणनेचे नेमकं झालं काय? असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला आहे. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वृक्ष संवर्धन समिती आज (सोमवार) बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डिकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, नगरसेवक शितल शिंदे, तुषार हिंगे, शाम लांडे, तुषार कामठे, नगरसेविका डाॅ. वैशाली घोडेकर, संभाजी बारणे उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व जमिनीवरील वृक्षांची गणना करण्यात येत आहे. जीआयएस, ईमेज सर्व्हर ऍप्लिकेशनद्वारे ही गणना होत आहे. या वृक्ष गणनेला दोन वर्षे अवधी देण्यात आला. मात्र, दीड वर्ष झाले तरी अद्याप वृक्ष गणनेची माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करु लागले आहेत. तसेच तीन वर्षे कालावधीत वृक्षांची देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम टेराकॉन इकोटेक प्रा. लि. संस्थेला 6 कोटी 76 लाख 42 हजार 718 रुपये खर्चाने ठेका देण्यास स्थायी समितीने 27 सप्टेंबर 2017 ला मंजुरी दिली होती.

दरम्यान,  शासनाच्या आदेशानुसार दर पाच वर्षांनी वृक्ष गणना करणे बंधनकारक आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेने या आदेशाला हरताळ फासला आहे. 2004 नंतर अद्याप वृक्षगणना करण्यात आली नव्हती. त्यामुळे 2017 मध्ये सॅटेलाईट वृक्षगणना करण्यास सुमारे 7 कोटीची मान्यता देण्यात आली.  परंतू, कागदोपत्री घोडे आणि साॅप्टवेअर प्रक्रियेमध्येच शहरातील वृक्षांची गणना अडकली आहे. तब्बल दीड वर्षे लोटले तरीही वृक्ष गणनेला मृहूर्त लागत नसल्याने वृक्ष संवर्धन समिती सदस्यांनी संताप व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button