breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वृक्ष प्राधिकरणाच्या साडेअठ्ठावीस कोटींच्या अंदाजपत्रकास स्थायींची मंजुरी

स्थायीच्या शिफारसीनुसार पालिकेच्या महासभेपुढे अंदाजपत्रक होणार सादर 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभाग वृक्ष प्राधिकरण समितीने सन 2018-19 चे सुधारीत आणि सन 2019-20 चे 28 कोटी 67 लाख 16 हजाराचे मूळ अंदाजपत्रक आज (मंगळवारी) स्थायी समिती मंजुरी दिली. हे अंदाजपत्रक स्थायी समितीकडून महासभेपुढे मान्यतेसाठी सादर होणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाने गतवर्षी वृक्षाऐवजी ठेकेदारांचे संवर्धन करणारे अंदाजपत्रक सादर केल्याची टीका झाली होती. वृक्ष प्राधिकरणाने वृक्ष गणना, रस्ते सुशोभीकरण, खड्डे खोदाई, बीयाणे खरेदी, ठेकेदारी पद्धतीने वृक्षसंवर्धन, पिंजरे खरेदी, बेंचेस खरेदी, पिंजरे दुरुस्ती या कामांवर भरीव तरतूद करण्यात आली होती. महाराष्ट्र नागरी क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन करणे अधिनियमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका वृक्ष संवर्धन विभागाने सन 2018-19 चे सुधारीत आणि 2019-20 चे मूळ वार्षिक अंदाजपत्रक वृक्ष प्राधिकरणाने स्थायी सभेत मान्यतेला ठेवले होते. वृक्ष प्राधिकरणाने तयार केलेले व मंजूर केलेले अंदाजपत्रक असून सन 2018-19 चे सुधारीत व सन 2019-20 चे मुळ अंदाजपत्रकात 28 कोटी 67 लाख 16 हजार रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीने मंजुर केले आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर वृक्ष प्राधिकरणाचे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेपुढे सादर होणार आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button