breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वृक्षांंची जीआयएस मॅंपिंगद्वारे गणना ; वृक्ष प्राधिकरणाचा निर्णय

पिंपरी –  महापालिका हद्दीतील वृक्षगणनेसह अवैध वृक्षतोडीला आळा घालावा याकरिता ‘जीआयएस’ मॅपिंगद्वारे झाडांची गणना करण्यात येणार आहे. त्यासाठी टेराकॉन या ठेकेदार कंपनीला  कामाचा आदेश दिली असून दोन्ही कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकेत वृक्ष प्राधिकरण समितीची सोमवारी (दि.25) बैठक पार पडली. यावेळी वृक्ष लागवड, वृक्ष गणना, अवैध वृक्षतोड यासह आदीवर चर्चा करण्यात आली. या सभेला  शीतल शिंदे, तुषार हिंगे, शाम लांडे, तुषार कामठे, संतोष लोंढे, भाऊसाहेब भोईर, साधना मळेकर, संभाजी बारणे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर उपस्थित होते.

यंदा शहरात सुमारे 60 हजार झाडे लावली जाणार आहेत.  त्या झाडांची खरेदी करण्यात आली. यापैकी 14 हजार झाडे ही चार ठिकाणी लावण्याचे निश्‍चित केले आहे.  टेराकाॅन या ठेकेदाराकडून शहरातील वृक्षांची संख्या, प्रजातीचे नाव, आयुर्मान, खोडाचे आकारमान अशी उपयुक्त माहिती उपलब्ध करुन घेण्यात येणार आहे.  तसेच सार्वजनिक जागेतील वृक्षतोडीची जागरुक नागरिकांकडून तत्काळ माहिती मिळते. मात्र, खासगी जागांमधील झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल झाल्यानंतर त्याची माहिती उद्यान विभागाला मिळत नाही. मात्र, जीआएसच्या माध्यमातून शहरातील सार्वजनिक व खासगी जागांमधील वृक्षांवर नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे आता कोणत्याही भागातील बेकायदेशीर वृक्षतोडीची माहिती तत्काळ उद्यान विभागाला समजणार आहे, अशी माहिती नगरसेवक शितल शिंदे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button