breaking-newsपुणेमहाराष्ट्र

विसापूर किल्ल्यावर अडकलेल्या तरुणाची पाच तासांनी सुटका

मळवली येथील विसापूर किल्ल्याच्या बुरुजावर अडकलेल्या एका तरुणाची सुटका करण्यात आली आहे. शिवदुर्ग टीमने या डॉक्टर तरुणाची सुटका केली आहे. अमर कोरे असं या डॉक्टरचं नाव असून तो विसापूर किल्ल्यावर पर्यटनासाठी गेला होता. गिर्यारोहण करत असताना तो विसापूर किल्ल्याच्या बुरुजावर अडकला. खालीही जाता येईना आणि वरही चढता येईना अशी त्याची अवस्था झाली त्याची ही अवस्था समजल्यावर शिवदुर्ग टीमने या ठिकाणी धाव घेतली आणि अमर कोरेची सुटका केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विसापूर किल्ल्यावर एक तरुण अडकल्याचा फोन कौशिक पाटील यांनी शिवदुर्ग टीमला केला होता. ८ ते १० तरुण विसापूर किल्ला चढाई करत होते. पहिल्या टप्प्यात सगळे बरोबर आले, पण पुढे रस्ता चुकल्याने ते जंगलात शिरले. नंतर वर जाण्यासाठी  किल्ल्याचा बुरुज दिसायला लागल्यावर थेट बुरुज चढाई करायला सुरू केले तेव्हा अमर अर्ध्या अंतरावर अडकला त्यामुळे तो खाली उतरु शकत नव्हता आणि वरही जाऊ शकत नव्हता.

पर्यटक विसापूरच्या बुरुजावर अडकल्याची माहिती शिवदुर्ग टीमला देण्यात आली. त्याच सोबत लोकेशन व व्हिडिओ पाठवण्यात आले. भाजे लेणी येथे शिवदुर्ग चा सागर कुंभार होता त्याने टीमसह तिथे तातडीने जाऊन संबंधित अडकलेल्या डॉक्टर तरुणाला धीर दिला. सागरने त्याला पकडून ठेवलेले होते. सागरच्या व विकासच्या मदतीने अमर उभा राहिला दोरीच्या आधाराने पकडून सुरक्षित ठिकाणी चालत आला.

मग त्याला हार्नेस घातले आणि सुरक्षित वर काढले तब्बल चार ते पाच तासांनी त्याला वर काढण्यात टीमला यश आले. विकास मावकर, सागर कुंभार, सागर बाळकुंद्री, पवन म्हाळसकर, दत्ता तनपुरे, रोहित नगिने, हेमंत वाघमारे, निलेश निकाळजे, अनिल आंद्रे, वैष्णवी भांगरे, निकेत तेलंगे,अमित भदोरीया, दिनेश पवार, आनंद गावडे, सुनिल गायकवाड यांनी त्या ठिकाणी जाऊन अडकलेल्या तरुणाला बाहेर काढण्यास मोलाचे योगदान होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button