breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विवाहितेचा छळ करून खून, मंगळसूत्र आणले नाही म्हणून

 माहेराहून पहिल्या पतीचे मंगळसूत्र आणण्यासाठी पतीसह सासरच्या लोकांनी चटके दिल्याने गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सासरा, दिराला अटक केली आहे. हा प्रकार देहूरोड, चिंचोली येथे घडला आहे.

मोनिका सोमनाथ जाधव (वय 31, रा. चिंचोली, देहूगाव) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मोनिकाचा पती सोमनाथ नारायण जाधव, सासू लक्ष्मीबाई नारायण जाधव, सासरे नारायण तुकाराम जाधव, दीर गणेश नारायण जाधव यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, सासरे नारायण, दीर गणेश याला अटक करण्यात आली आहे. याबाबत मोनिकाची आई शांता रमेश पोवार (वय 51, रा. वारजे माळवाडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोनिकाचे सोमनाथ जाधव याच्याशी दुसरे लग्न झाले होते. माहेराहून पहिल्या पतीचे मंगळसूत्र आणण्यासाठी पती, सासू, सासरे हे मोनिकाला शारीरिक व मानसिक त्रास देत होते. तसेच लाथ्या-बुक्यांनी मारहाण देखील केली जात होती. चटके देऊन मोनिकाला जखमी केले होते. गंभीर जखमी झालेल्या मोनिकाचा सोमवारी (दि.13)उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात जखमामुळेच मोनिकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button