विरोधकांच्या एकीच्या बळाने भाजपला केलं पराभूत
नवी दिल्ली : दहा राज्यांत झालेल्या चार लोकसभा आणि ११ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला विरोधकांच्या एकीने जोरदार दणका दिला. भाजपला पालघर लोकसभा आणि उत्तराखंडमध्ये थराली विधानसभा अशा दोनच जागा जिंकता आल्या, उर्वरित जागांवर विरोधकांचे उमेदवार मतांच्या मोठ्या फरकाने निवडून आले.
‘आरएलडी’ला सप, बसप, काँग्रेस या सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता. विरोधकांची एकी सांभाळण्यासाठी काँग्रेसने कैराना लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा केलेला नव्हता. गोरखपूर आणि फूलपूर या लोकसभा पोटनिवडणुकीत सप आणि बसपने एकत्र येत भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वासाठी कैरानाची पोटनिवडणूक महत्त्वाची मानली जात होती, मात्र मोक्याच्या मतदारसंघात आदित्यनाथांची नाचक्की झाली.
दरम्यान, कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यात भाजपाच्या विरोधात देशभरातील पक्ष एकत्र आले होते. त्या एकजुटीचा पोटनिवडणुकीत मोठा विजय झाला आहे. एकाच व्यासपीठावर असलेल्या या सात पक्षांनी भाजपाला चांगलाच दणका दिला आहे.