breaking-newsराष्ट्रिय

विना अनुदानित सिलिंडर 59 रुपयांनी महागले

नवी दिल्ली – इंधन दरवाढीची छळ बसत असताना रविवारी अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 2 रुपये 89 पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे 499.51 पैशांना मिळणारा सिलिंडर आता 502.40 पैशांना खरेदी करावा लागणार आहे. तर विना अनुदानित सिलिंडर तब्बल 59 रुपयांनी महागले आहे. ही दरवाढ मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेल्या घरसरणीमुळे विना अनुदानित सिलिंडरच्या दरात ही वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली. तसेच अनुदानित सिलिंडरच्या दरातील वाढ ही जीएसटीमुळे करण्यात आली आहे, असे अधिका-यांनी सांगितले. विना अनुदानित सिलिंडरची किंमत 879 रुपयांवर पोहचली आहे. त्यामुळे आता बॅक खात्यांमध्ये 376.60 रुपये प्रति सिलिंडर सबसिडी जमा होणार आहे. यापूर्वी 320.49 पैसे सबसिडी मिळत होती.

इंधन दरातही वाढ
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फटका पुन्हा एकदा नागरिकांना बसला आहे. कारण आजही इंधनाच्या किंमतीत वाढ झाली असून पेट्रोल 22 पैशांनी, तर डिझेल 21 पैशांनी महागले आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर 91.08 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 79.72 रुपये प्रती लिटरपर्यंत पोहोचले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button