breaking-newsपुणे

विद्यार्थिनींच्या अंतर्वस्त्राचा रंगही शाळा ठरवणार, पुण्याच्या शाळेत अजब अटी; पालक संतप्त

पुणे– शाळेतील विद्यार्थिनींनी पांढऱ्या आणि स्किन रंगाची अंतवस्त्रे घालावी, स्कर्टची लांबीही ठरावीक असावी, पालकांनी शाळेच्या विरोधात आंदोलन करू नये, पालकांनी एकमेकांशी बोलू नये, विद्यार्थ्यांनी केस एकदम लहान ठेवावे अशा विचित्र आणि जाचक अटी पुण्यातील एका शाळेमध्ये घालण्यात आल्या आहेत. पुण्यातील माईर्स एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुल या शाळेच्या प्रशासनाने केवळ विद्यार्थ्यांवरच नाही तर पालकांवरही अशा जाचक अटी घातल्या आहेत. चिडलेल्या पालकांनी बुधवारी प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांना घेराव घातला आणि शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या शाळेने अशाप्रकारच्या सुमारे 20 ते 22 जाचक अटींची सक्ती केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विद्यार्थिनींनी सौदर्य प्रसाधने वापरू नयेत, टॅटू काढू नयेत, लिपस्टीक , लिप ग्लॉस किंवा अन्य कुठलीही कॉस्मेटिक्स वापरायचे नाहीत, कानातले सोडून कोणतेच दागिने घालायचे नाहीत, कानातलेही जास्त मोठे नकोत आणि त्यांचा रंगही काळा, सोनेरी किंवा चंदेरीच असावा , विद्यार्थी आणि पालकांनी शाळेच्या परवानगीशिवाय कोणत्याही राजकीय, धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचं नाही, प्रशासन आणि माध्यमांसोबत पालकांनी संवाद साधू नये आदी अटींचाही यात समावेश आहे.

माईर्स एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुलच्या अंतर्गत येणाऱ्या श्री सरस्वती न्यू इंग्लिश शाळा, श्री स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा आणि एमआयटी पूर्व प्राथमिक शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थी आणि पालकांसाठी डायरीमार्फत ही नियमावली जाहीर केली आहे. त्याहून कहर म्हणजे या अटींचा भंग केल्य़ास पालकांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र लिहून आणण्याची सक्ती शाळेने केली आहे. त्यामुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट पसरली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button