breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

वाहतूकीची समस्या; हिंजवडीत बसविणार ‘सीसीटीव्ही’

  • तळेगाव, चाकण एमआयडीसीसह 25 ठिकाणी ‘करडी नजर’
  • 16 कोटी खर्चास संचालक मंडळाची मान्यता

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहर नेटवर्क आणि स्मार्ट ट्रॅफिक सोल्यूशन्स घटकांच्या अंतर्गत पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील हिंजवडी स्थानांची 25 ठिकाणे, तळेगाव आणि चाकण एमआयडीसी परिसरात सुमारे 5 हजार ‘सीसीटीव्ही’ बसविण्यात येणार आहेत. त्यास स्मार्ट सिटी संचालक मंडळाने 16 कोटी रुपयास मान्यता दिली. यामुळे वाहतुकीच्या समस्या सुटण्यास निश्चित मदत होणार आहे.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड संचालक मंडळाची आठवी बैठक आज (शुक्रवार) महानगरपालिका आयुक्त कक्षात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, केंद्र शासन प्रतिनिधी ममता बात्रा, महापाैर राहूल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते दत्ता साने, संचालक प्रमोद कुटे, सचिन चिखले, पोलिस आयुक्त आर.के.पद्यनाभन, पीएमपी व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, विभागीय आयुक्त पी.एस.खांडकेकर, आयुक्त तथा सीईओ श्रावण हर्डिकर, निळकंठ पोमण, राजन पाटील, लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे आदी उपस्थित होते.

स्मार्ट सिटी प्रकल्पात वाहतूक समस्या सोडवण्यावर भर दिला आहे. स्मार्ट सिटीच्या पॅन सिटीमधून शहर पर्यवेक्षण, नेटवर्क आणि स्मार्ट ट्रॅफिक सोल्यूशन्स अंतर्गत पोलिस आयुक्तालय हद्दीतील सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. त्यात हिंजवडीमधील 25 ठिकाणे सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. सदरील कामे मे. टेक महिंद्रा लिमिटेड या कंपनीकडून केली जाणार आहेत. त्या कामास 16 कोटी रुपयास स्मार्ट सिटी संचालक मंडळाने मान्यता दिली. तसेच चाकण, तळेगाव एमआयडीसीमधून निधी प्राप्त झाल्याने सीसीटीव्ही कामकाजाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याशिवाय पोलिस आयुक्त यांनी गृह विभागाने चाकण, तळेगाव परिसरात स्मार्ट सिटीतून कॅमेरे बसवण्याचा समावेश करण्यात आलेली आहे, अशी माहिती आयुक्त तथा सीईओ श्रावण हर्डिकर यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button