breaking-newsपुणेमहाराष्ट्र

वारकऱ्यांसाठी 210 डॉक्‍टरांचे पथक तैनात

  • 660 आरोग्य कर्मचारी; प्रत्येक खासगी रुग्णालयात दहा टक्‍के जागा राखीव

पुणे- दरवर्षीप्रमाणे आषाढी वारीच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. यासाठी आरोग्य विभागाकडूनही तयारी पूर्ण झाली असून आरोग्य विभागाचे जिल्ह्यात 210 डॉक्‍टर्स असणार आहेत. तसेच 660 आरोग्य कर्मचारी या काळात काम करणार आहेत. तर प्रत्येकी दोन अशी 25 आरोग्यदूत यांची पथकेही या दरम्यान असणार आहेत. वारीत प्रत्येक खासगी रुग्णालयात दहा टक्‍के जागा राखीव ठेवण्यासही आरोग्य विभागाने सूचना दिल्या आहेत.
येत्या गुरुवारी व शुक्रवारी आळंदीहून दोन्ही पालख्या पंढरपुराकडे प्रस्थान करणार आहेत. या पालख्यांमध्ये राज्यातून आलेले लाखो वारकरी सहभागी होणार आहेत. पुणे जिल्ह्यात पालखीदरम्यान आरोग्य सेवा पुरविण्यात येणार असून त्यासाठी आरोग्य विभागाने विविध आरोग्यविषयक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये धूरफवारणी करणे, तसेच टॅंकरमधील पाण्याची तपासणी करणे आदी कामे आरोग्य विभागाकडून सुरु झाली आहेत.
याबाबत माहिती देताना पुणे परिमंडळचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख म्हणाले, पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 110 तर अन्य नागरी रुग्णालयांतील 100 असे 210 डॉक्‍टर्स या दरम्यान आरोग्य सेवा देतील. या दरम्यान जिल्ह्यात 13 ग्रामीण रुग्णालये आहेत तसेच 22 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. जिल्ह्यात 74 तर अन्य 100 ऍम्बुलन्सही 108 क्रमांकाच्या उपलब्ध आहेत. वारकऱ्यांना छोटी मोठी औषधे देणे, त्यांना चक्‍कर येत असल्यास गाडीवरजवळच्या उपचार केंद्रापर्यंत हलविणे आदीसाठी आरोग्यदूतांची 25 पथक वारीदरम्यान कार्यरत राहतील.

 
पालिकेतर्फेही फिरते वैद्यकीय पथक व श्‍वानांचा बंदोबस्त
राज्याच्या आरोग्य केंद्राबरोबरच पालिकेच्या आरोग्य विभागाकडून तयारी करण्यात आली आहे. याबाबत सहायक आरोग्य अधिकारी डॉ.संजीव वावरे म्हणाले, पालिकेकडून पालखीच्या मुक्‍कामी ठिकाणी फिरते वैद्यकीय मोफत सुविधा देणारे पथक असणार आहेत. नाना पेठसारख्या ठिकाणी 24 तास वैद्यकीय सेवा पुरविण्यात येईल. तसेच शहरात ज्या, ज्या ठिकाणी कचरा, अस्वच्छता आहे. तेथे औषध फवारणी करण्यात येणार आहे. त्याचरोबर पालखी मुक्‍कामी ठिकाणी मोकाट श्‍वानांचा बंदोबस्त करण्यात येईल. तसेच पालखी काळात त्या मार्गावरील मांसविक्री करणारी दुकानेही बंद ठेवण्यात येतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button