breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वायसीएम रुग्णालय परिसरातून डाॅक्टरांची मोटारसायकल चोरीला

पिंपरी – यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात ट्रेनी डॉक्टर म्हणून नोकरीस असलेल्या महिला डॉक्टरची दुचाकी रुग्णालयात परिसरातून चोरीला गेली. हा प्रकार रविवारी (दि. 10) दिवसा घडला.

सना बशीर खान (वय 23, रा. नाणेकर हॉस्टेल, सुदर्शन नगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सना खान पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात मागील दोन महिन्यांपासून ट्रेनी डॉक्टर म्हणून नोकरी करतात. नाणेकर हॉस्टेल वरून वायसीएम रुग्णालयात येण्यासाठी त्यांनी मोहम्मद शहा यांच्याकडून एमएच 14 / जी के 2341 ही सुझुकी मोपेड दुचाकी खरेदी केली. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास खान यांनी रुग्णालयात साई मंदिरासमोर दुचाकी पार्क केली. सायंकाळी काम संपल्यानंतर घरी जाताना दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी खान आल्या असता त्यांना दुचाकी आढळली नाही. संपूर्ण रुग्णालय परिसरात शोध घेतला असता, दुचाकी मिळून आली नाही. त्यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button