Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वायसीएममध्ये डाॅक्टरांचा हलगर्जीपणा ; महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण ?

– संबंधित महिलेची प्रसृती करणारे डाॅक्टर शांत 

– त्या प्रकरणाशी संबंध नसणा-या अन्य डाॅक्टराचे दबावतंत्रासाठी राजीनामा नाट्य ?

पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या घटनामध्ये वाढ होवू लागली आहे. त्यांच्याच फटका चाकणमधील एक महिला रुग्णाला बसला आहे. संबंधित महिला रुग्ण प्रसुतीसाठी दाखल झाल्यानंतर तिच्यावर सिझरची शस्त्रक्रिया करताना तपासणीत हलगर्जीपणा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत संंबंधित शस्त्रक्रिया करणा-या दोन डाॅक्टरांना जाब विचारण्यात येणार होता. परंतू, हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता वाटताच, त्या प्रकरणाशी संबंध नसणा-या आणि गायनॅक विभागातील अन्य चार डाॅक्टरांनी वरिष्ठांवर दबाब टाकण्यासाठी राजीनामा नाट्य घडवून आणले आहे. एकंदरित महिलेच्या मृत्यू प्रकरणातील दोषी डाॅक्टरांना जाब विचारु नये, याकरिता अन्य डाॅक्टरांनी त्या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळावी, म्हणून राजीनामा नाट्याचे सोंग केल्याची जोरदार चर्चा वायसीएम रुग्णालयात रंगली आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात एका महिलेची सिझरद्वारे प्रसृती करण्यात आली. त्या महिला रुग्णाची सिझरची शस्त्रक्रिया करताना बाळ सुखरुप असले तरी काही तांत्रिक बाबीकडे डाॅक्टरांनी दुर्लक्ष केल्याने तिचा मृत्यू झाला.  याबाबत संबंधित डाॅक्टरांना वायसीएम रुग्णालयातील वरिष्ठ डाॅक्टराकडून जाब विचारणार येणार होता. तसा त्याना कारणे दाखवा नोटिस काढून खुलासा मागविण्यात येणार होता. परंतू, त्या महिलेची प्रसृती शस्त्रक्रिया करणा-या डाॅक्टर हे मोबाईल स्वीच आॅफ करुन बसले होते. त्यामुळे गायनॅक विभागातील प्रमुखासह अन्य डाॅक्टरांना ही कुणकुण लागली. हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता वाटताच, गायनॅक विभागातील त्या प्रकरणाशी संबंध नसणा-या अन्य चार डाॅक्टरांनी वरिष्ठांवर विविध आरोप करुन राजीनामा देत असल्याचे आरोग्य वैद्यकीय विभागाकडे कळविण्यात आले.

दरम्यान, वायसीएम रुग्णालयाच्या गायनॅक विभागातील त्या महिलेच्या मृत्यू प्रकरणाची चाैकशी होणे आवश्यक आहे. संबंधित महिलेची प्रसृती करणा-या त्या डाॅक्टरांनी नेमका काय ? हलगर्जीपणा केला, त्या महिलेचा बळी जावून संबंधित कुटूंब उघड्यावर आले आहे. यापुर्वी देखील गायनॅक विभागात महिलांच्या प्रसृती करताना डाॅक्टराच्या चुकीचा फटका बसून रुग्णांचे बळी जावू लागले आहेत. या प्रकरणात दोषी असणा-या डाॅक्टरांना कारवाई झाली पाहिजे. परंतू, हे प्रकरण दडपण्यासाठी गायनॅक विभागातील अन्य चार डाॅक्टर राजीनामे देवून प्रशासनावर दबाबतंत्र टाकू लागले आहे. त्यामुळे संबंधित महिलेच्या मृत्यूची चाैकशी झाल्याशिवाय खरे सत्य बाहेर येणार नाही, अशी मागणी नागरिकांतून होवू लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button