breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वायसीएममधील एक्स-रे मशीनची दुरुस्ती करा

पिंपरी – महापलिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामधील एक्स-रे मशीन बंद आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याने हे मशीन लवकरात लवकर सुरु करावे, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत महापालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे याना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, खासगी ठिकाणी एक्स-रे काढण्यासाठी अधिक खर्च येतो. गरीब रुग्णाला तो खर्च परवडणारा नाही. मशीन बंद असल्यामुळे रुग्णाला त्रासाला सामोरे जावे लागते. त्यासाठी ही मशीन लवकर सुरु करावे, अन्यथा तीव्र आंदोलना करण्याचा इशाराही शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिका-यांनी दिला. यावेळी कक्षाचे शहरप्रमुख गणेश जाधव, विद्यासागर गायकवाड, रुपेश कदम, दताराम साळवी, गोरखनाथ कवडे, चंद्रशेखर कणसे, कैलास कुदळे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button