breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वायसीएमचे डॉक्टर ठरले ‘देवदूत’, “६५९ ग्रॅमची परी, आनंद घेऊन आली दारी”

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयावर आणि येथील डॉक्टरांवर वेळोवेळी टिकाटिपन्न झालेली आहे. परंतु, येथील डॉक्टरांनी केलेल्या चांगल्या कामांची देखील दखल घेण्याची आवश्यकता आहे. खासगी रुग्णालयात आई किंवा बाळ दोघांपैकी एकाला वाचविण्याची खात्री दिलेल्या गरोदर मातेला सातव्या महिन्यातच प्रसुती वेदना झाल्याने त्यांची प्रसुती यशस्वीरित्या पार पाडून बाळ आणि आई दोघांना सुखरूप ठेवण्यात वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे.

वायसीएम रुग्णालयात 27 डिसेंबर 2018 रोजी दुपारी दीड वाजता आश्विनी चक्रनारायण या दाखल झाल्या. त्यांना सातव्या महिन्यातच प्रसुती वेदना होऊ लागल्या. त्यांना रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे त्यांची प्रसुती खडतर होती. त्यातच तज्ञ डॉक्टरांनी आश्विनी यांची प्रसुती यशस्वीपणे हाताळली. त्यांनी अवघ्या 695 ग्रॅम वजनाच्या मुलीला जन्म दिला. खूपच कमी वजन असल्यामुळे बाळाच्या भविष्याविषयी नातेवाईकांना चिंता लागली होती. परंतु, डॉक्टर आणि त्यांच्या सहका-यांनी 695 ग्राम वजनाच्या बाळाचे वजन अवघ्या 70 दिवसांमध्ये 1600 ग्रॅम एवढे केले. अत्यंत कठीन प्रसुती यशस्वी करण्यात डॉक्टरांनी खूप परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज बाळ आणि बाळाची आई दोघे सुखरूप आहेत. यामुळे नातेवाईकांच्या चेह-यावर आनंद दिसत आहे.

  • वायसीएम रुग्णालयातील निष्णांत स्त्रिरोग तज्ञांनी तातडीने छेदप्रसूती केली. बाळाला नवजात शिशुकक्षामध्ये दाखल करून कृ त्रीम श्वासोच्छवास यंत्रावर ठेवले. फुफुसाच्या परिपक्वतेसाठी Surfactant नावाचे इंजेक्शन देण्यात आले. सुरुवातीचे काही दिवस बाळाची तब्येत बरेचदा खालावली. कारण बाळाला गंभीर जंतूसंसर्ग व न्यूमोनिया झाला होता. प्रकृती कमकुवत असल्यामुळे आईचे दुध पचण्यास त्याला त्रास होत होता. परंतु, या ६९५ ग्राम वाजनाच्या परीने खूप मोठी लढाई जिंकली. सगळ्या अडथळ्यांवर मात करून ७० दिवसांच्या भयानक प्रवासानंतर  आज ती १६०० ग्रॅम वजनापर्यंत पोचली आहे, अशी माहिती बालरोग तज्ञ डॉ. दीपाली अंबिके यांनी दिली.

 

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button