breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादी युवकचे जोरदार आंदोलन

  • भाजप सरकारच्या विरोधात केली नारेबाजी
  • बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राज्यभरासह पिंपरी-चिंचवड शहरात बेरोजगारी वाढविणा-या भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. निगडीतील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोर नारेबाजी करून भाजप सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.

आज गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी -चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक निलेश पांढरकर, ज्येष्ठ नगरसेविका सुमन पवळे, प्रदेश संघटक विशाल काळभोर, मयुर जाधव, प्रतिक साळुंके, कार्य़ाध्यक्ष योगेश गवळी, निखील दळवी, पिंपरी अध्यक्ष शेखर काटे, भागवत जवळकर, हर्षवर्धन भोईर, विशाल पवार, प्रमोद ताम्हाणे, अलोक गायकवाड, विध्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, रमणदिपसिंग कोहली, विनोद कांबळे, कुणाल तुपे, चैतन्य चोरडिया, विनायक काळभोर, मजर खान उपस्थित होते.

भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी राज्यभरातील सुशिक्षीत तरुणांना नोकरी देण्याचा शब्द दिला होता. सत्तेवर येऊन चार वर्षांचा कार्यकाळ संपला तरी राज्यभरासह पिंपरी-चिंचवड शहरातल्या तरुणांना नोकरी मिळालेली नाही. उलट बेरोजगारी वाढली आहे. दरवर्षी शिक्षण घेऊन बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. नोकरी देण्याच्या नावाखाली भाजपने या तरुणांची फसवणूक केली आहे. याच्या निषेधार्त राष्ट्रवादी युवक पदाधिका-यांनी भाजप सरकारच्या विरोधात नारेजबाजी केली. बेरोजगारीला कंटाळून तरुणांवर वडापाव स्टॉल टाकण्याची वेळ आली आहे. हा संदेश युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी आंदोलनातून दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button