breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकडमध्ये गुन्हेगारांकडून पोलिसांवर सशस्त्र हल्ला, हवालदाराचा खुबा ‘फ्रॅक्चर’

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – वाकड पोलीस ठाण्याच्या आवारात लागलेले दोन गटातील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जमावाने सशस्त्र हल्ला चढविला. यात पोलिसांना मारहाण केल्याने पोलीस हवालदार भांडवलकर यांचा उजव्या पायाचा खुबा फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणी पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार गुरूवारी (दि. 10) दुपारी बाराच्या सुमारास वाकड पोलीस ठाण्याच्या समोर घडला.

साजन सुभाष सुकळे (वय 19), सुभाष रामा सुकळे (वय 40), लहु बापू सुकळे (वय 23), अनिल अण्णा सुकळे (वय 22), शिवाजी बापू सुकळे (वय 30, सर्व रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस नाईक व्ही. एस. कुदळे यांनी फिर्याद नोंदविली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या समोर वरील गुन्हेगारांनी बेकायदेशीर जमाव जमवून आपापसात झोंबाझोबी केली. दोन गटात मारामारी सुरू असताना पोलिसांनी मध्यस्ती करून हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यावर दोन गटातील वाद बाजुला राहून पोलिसांवरच हल्ला झाला. वरील पाचजणांमधील एकाने धारदार कोयता पोलिसांवर उगारला. पोलीस हवालदार भांडवलकर यांच्यासोबत चांगलीच झोंबाझोंबी होऊन धक्काबुक्की झाली. त्यांच्या पायावर काठीचा वर्मी घाव बसल्याने पायाचा खुबा फ्रॅक्चर झाला आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांवरच हल्ला होण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच निदर्शनास येत आहे. हल्लेखोर पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button