breaking-newsराष्ट्रिय

वसुंधरा राजेंची त्रिपुरसुंदरी मंदिरात धाव

: राजस्थानसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. सुरुवातीच्या कलानुसार बहुतांश ठिकाणी काँग्रेस आघाडीवर आहे. याचदरम्यान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनी बांसवाडा येथील त्रिपुरसुंदरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्या दिवसभर मंदिरात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गतवेळी मतमोजणीच्या काळात त्या दिवसभर मंदिरात उपस्थित होत्या. एक्झिट पोलमध्ये राजस्थानमध्ये सत्ता परिवर्तनाची शक्यता असून मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेस बहुमताकडे वाटचाल करत आहे.

नोव्हेंबरच्या अखेरीस राजस्थानच्या १९९ जागांवर मतदान झाले होते. सध्या राज्यात भाजपाचे सरकार असून भाजपाने वसुंधरा राजे यांनाच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर केले आहे. काँग्रेसने भाजपाला राज्यात चांगलीच टक्कर दिली आहे. सध्या तरी दोन्ही पक्षांमध्ये काँटे की टक्कर सुरु आहे.

काँग्रेसने या निवडणुकीत आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा स्पष्ट केलेला नव्हता. प्रचारसभांमध्ये राहुल गांधींच मध्यवर्ती भुमिकेत होते. त्यांनी राज्यात माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत आणि युवा नेतृत्व सचिन पायलट दोघांकडेही प्रचाराची धुरा सोपवली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button