breaking-newsराष्ट्रिय

वढेरा यांना बजावण्यात आलेल्या नोटिसीबाबत राहुल गप्प का?

  • भाजपचा सवाल 

नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाने करचुकवेगिरीबद्दल रॉबर्ट वढेरा यांना नोटीस बजावली आहे. त्यावरून भाजपने त्यांचे मेहुणे आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

प्राप्तिकर विभागाने वढेरा आणि त्यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी कंपनीला 2010-11 या वर्षासाठीची 25 कोटी रूपये इतकी कर थकबाकी चुकती करण्यासाठी नोटीस बजावली आहे. त्यावरून भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल यांना लक्ष्य केले. वढेरा यांना बजावण्यात आलेल्या नोटिसीबाबत राहुल गप्प का आहेत?

कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील यूपीएच्या राजवटीवेळी वढेरा आणि देशाबाहेर पयालन केलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या हे भ्रष्टाचाराचे प्रतीक होते. कायदेशीर कारवाईमुळे आता वढेरा आणि मल्ल्यांना असुरक्षित वाटत आहे. यूपीएच्या राजवटीत भरभराट झालेल्या त्या दोघांनी कायद्याचा भंग केला. किंग ऑफ गुड टाईम्स ते बॅंक घोटाळ्यांचा पोस्टर बॉय असा मल्ल्याचा प्रवास झाला आहे.

यूपीएच्या राजवटीत खुषीत असणारा मल्ल्या आता दु:खी आहे. त्यातून कर्ज बुडव्यांबाबत यूपीए सरकारची भूमिका आणि एनडीए सरकारची भूमिका स्पष्ट होईल, असे पात्रा म्हणाले. कर्ज प्रकरणी दिलासा मिळावा यासाठी मल्ल्याने 2013 मध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी.चिदंबरम्‌ यांना पत्र पाठवले होते, असा दावाही पात्रा यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button