breaking-newsराष्ट्रिय

वकीलच झाला चोर, न्यायालयाच्या आवारातील फणस तोडल्यामुळे थेट तुरुंगात

उत्तर प्रदेशमधील एका वकीलाला फणस तोडणे महाग पडले आहे. या वकिलाने न्यायालयाच्या परिसरातील फणस तोडल्यामुळे त्याला अटक करण्यात आली. या वकिलाचे नाव नीरज चौधरी असे आहे. अटक केल्यानंतर त्याच्यावर फणस तोडण्याचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे लगेचच त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. हा अजब प्रकार उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात घडला आहे.

बस्ती जिल्ह्यात दिवाणी न्यायालय आहे. या न्यायालयाच्या परिसरात एक फणसाचे झाड आहे. वकिल निरज चौधरी यांनी भल्या पहाटे येऊन या झाडावकरचा फणस तोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका शिपायाने निरज यांना हा प्रताप करताना पाहिले. त्या शिपायाने निरज यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी शिपायाला विरोध करत त्याला मारहाण केली. झाल्या प्रकारमुळे शिपाई संतापला व त्याने थेट १०० क्रमांकावर फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

नीरज चौधरी यांची घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी झडती घेतली. दरम्यान त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीत त्यावेळी पोलिसांना एक फणस सापडला. पोलिसांनी त्यानंतर त्यांना अटक केली. चोरीचा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आला. न्यायालयात नीरज यांना हजर करण्यात आले. न्यायमूर्तींनी त्यांना यावेळी न्यायालयीन कोठडी सुनावली. सध्या नीरज तुरुंगात आहेत. बस्तीच्या दिवाणी न्यायालय परिसरातील फणस सर्रास चोरीला जात असल्याने असे प्रकार रोखण्यासाठी शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button