breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
लोणावळ्यात रेल्वे टिसीकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा ; देशद्रोहाचा गुन्हा दाखल
पुणे – पुलवामा हल्ल्यामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडालाय. पाकिस्तानविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जातोय. लोणावळ्यात एका रेल्वे कर्मचाऱ्याने शिवाजी चौकात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी केली. यानंतर या टीसीला पकडून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय त्याचं तातडीने निलंबनही करण्यात आलं.
उपेंद्र कुमार श्रीवीर बहादूरसिंग असं या रेल्वे कर्मचाऱ्याचं नाव आहे. तो मूळचा बिहारमधील असून लोणावळा स्थानकात कामाला होता. देशविरोधी घोषणा देणाऱ्या या विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वपक्षियांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केली. पोलिसांनी कठोर कारवाईचं आश्वासन देत जमावाला शांत केलं.