breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोकसभा, विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर सोमवारी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची बैठक

आजी-माजी पदाधिका-यांचा अजित पवार घेणार आढावा

शहराध्यक्षांसह दोन कार्याध्यक्ष निवडीवर होणार खल

पिंपरी ( महा ई न्यूज ) – मावळ लोकसभेसह पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ विधानसभा निवडणुकींच्या जय्यत तयारीबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची सोमवारी (दि.1 आॅक्टोबर, सायं.4 वाजता) चिंचवडमधील एका खासगी हाॅटेलमध्ये आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निवडणुक पुर्व दिलेल्या सर्व कामकाजाचा आढावा घेणार आहे. याप्रसंगी राष्ट्रवादीचे आजी-माजी पदाधिकारी, आमदार, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. त्याचशिवाय पिंपरी चिंचवड शहरासाठी नवीन शहराध्यक्ष, दोन कार्याध्यक्ष निवडीवर बैठकीत खल होणार असल्याची चर्चा पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. 

लोकसभा, विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाकडून निवडणुक पुर्व कामकाजाचा आढावा घेण्यात येत आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून बुथ तिथं युथ संकल्पना डोळ्यासमोर ठेवून एका बुथवर किमान दहा कार्यकर्ते जोडण्याचे उदिष्ट ठेवले होते.  त्यानूसार पिंपरी चिंचवड शहरातील आजी-माजी नगरसेवक, आमदार, पक्षाचे पदाधिकारी, युवक-युवतीचे कार्यकर्ते यांच्यासह सर्व सेलच्या पदाधिका-यांना काजकाज ठरवून दिले होते. ठरवून दिलेल्या कामानूसार कार्यकर्त्यांनी कामे केली का? तसेच लोकसभा निवडणुक सहा-सात महिन्यावर येवून ठेपली आहे. त्यावर पक्षातील पदाधिका-यांशी चर्चा विनिमय करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यातील सोमवारी सकाळी 11 वाजताची बैठक आटोपल्यानंतर सायंकाळी 4 वाजता पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा आढावा घेण्यात येणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button