breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीची राष्ट्रवादी कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर

मुंबई – लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे. बारामतीतून सुप्रिया सुळे, रायगडमधून सुनील तटकरे, कोल्हापुरातून धनंजय महाडिक, साताऱ्यातून उदयन राजे भोसले यांच्यासह इतर नावे जाहीर करण्यात आली आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. कल्याणमधून बाबाजी पाटील, ठाण्यातून आनंद परांजपे यांचीही नावे जाहीर करण्यात आली आहेत. एकूण 11 जणांची यादी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज जाहीर केली आहे. मात्र, पार्थ पवार यांचे नाव या यादीत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

आज पार्थ पवार यांचं नाव मात्र जाहीर करण्यात आलं नाही. याबाबत जयंत पाटील यांनी योग्य वेळी निर्णय जाहीर करू, असं सांगितलं आहे. तो निर्णय आमच्या मनाप्रमाणे जाहीर करू द्या, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण पार्थसाठी माघार घेतल्याचे सांगितले होते. तरीही, पहिल्या यादीत पार्थ पवार यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे.

पहिल्या यादीतील उमेदवार 
रायगड – सुनील तटकरे
बारामती – सुप्रिया सुळे
सातारा – उदयनराजे भोसले
बुलडाणा – राजेंद्र शिंगणे
जळगाव – गुलाबराव देवकर
परभणी – राजेश विटेकर
ईसान्य मुंबई   – संजय दीना पाटील
ठाणे – आनंद परांजपे
कल्याण – बाबाजी बाळाराम पाटील
हातकणंगले – स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा
लक्षद्विप – मोहम्मद फैझल

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button