breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लेह-लढाख सायकल प्रवासातून पर्यावरणाचा संदेश! 

  • मोहीम यशस्वी करणार : पुणे-पिंपरी-चिंचवडमधील सायकलपटूंचा निर्धार 
पिंपरी – मनाली ते लेह-लढाख असा खडतर प्रवास सायकलद्वारे करुन पर्यावरण, आरोग्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा निर्धार पुणे व पिंपरी-चिंचवडमधील ०६सायकलपटूंनी केला आहे.
सध्या धावपळीच्या जगात नागरिकांचे पर्यावरण, आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. पुरेसा शारीरिक व्यायाम आणि पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. तसेच, देशात सध्या जाती-जातीत आणि धार्मिक तेढ वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर सायकलप्रेमी ०६ जणांच्या संघाने मनाली ते लेह-लढाख असा खडतर प्रवास दहा दिवस सायकलद्वारे करण्याचा निर्धार केला आहे.
दिनांक 3 ऑगस्ट रोजी पुण्यातून ही टीम मनालीकडे रवाना होणार आहे. दि. 5 ते 14 ऑगस्ट असे दहा दिवस रोज 50 किमी अंतर सायकलवर पार करणार आहेत. सदरची मोहीम काश्मीर ते कन्याकुमारी सायकल वारी केलेले  गोरक्षनाथ काळखैरे यांच्या नेतृत्त्वाखाली राबवण्यात येणार आहे. तसेच, सायकल स्पर्धेतील राष्ट्रीय प्रशिक्षक आणि माजी सैनिक धर्मेंद्र लांबा या मोहीमेत मार्गदर्शन करणार आहेत.
या माहिमेत पिंपरी-चिंचवडमधील सुनील सदिगले, राजेंद्र चेडे, सारंग हातोळकर, सुधीर कुलकर्णी, रघुदत्त अग्निहोत्री, गोरख काळखैरे यांचा समावेश आहे.
सहा महिन्यांपासून मोहीमेची तयारी…
मनाली ते लेह-लढाख हा सायकल प्रवास अत्यंत खडतर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 18380 हजार फूट उंच असलेला हा मार्ग आहे. सर्व सायकलपटू मनाली येथील गिर्यारोहण संस्थेच्या मदतीने मोहीम पूर्ण करणार आहेत. त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सराव सुरू केला आहे. भंडारा डोंगर, चांदणी चौक, लवासा आदी परिसरातील टेकडींवर सराव करण्यात आला आहे. तसेच, आषाढ वारीनिमित्त पुणे ते पंढरपूर आणि पंढरपूर ते पुणे असा प्रवासही सायकलद्वारे करण्यात आला, अशी माहिती मोहीमेचे समन्वयक राजेंद्र चेडे यांनी दिली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button