breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लिंकरोडच्या पुनर्वसन प्रकल्पात नागरिकांना ताबा द्यावा – नगरसेविका कोमल मेवाणी

चिंचवड – चिंचवडच्या पत्राशेड लिंकरोड येथे जेएनयुआर अंतर्गत बांधलेला पुनर्वसन प्रकल्प बंद आहे. या प्रकल्पातील घरांची तोडफोड झालेली आहे. तरी हा प्रकल्प न्यायालयीन बाब असल्याने प्रलंबित आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना ताबा मिळालेला नाही. या प्रकल्पामध्ये आयुक्तांनी घालून नागरिकांना घरे द्यावी, अशी मागणी नगरसेविका कोमल मेवाणी यांनी आयुक्तांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले  महानगरपालिकेतील कायदेविभागातील संबंधीत अधिका-यांशी वारंवार विचारणा केली असता असमाधानकारक उत्तरे मिळत आहे. याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या प्रलंबित प्रकल्पाकडे वैयक्तिकरित्या लक्ष देऊन सदर प्रकल्पकांच्या प्रलंबित कामकाजाची पूर्तता करावी. या परिसरातील नागरिक गेल्या दहा वर्षांपासून पत्राशेडमध्ये राहत असून ही घरे जीर्ण अवस्थेत आहेत,काही गरीब लोकांची घरे वादळी पावसाळीमुळे पडू लागली आहे. तेथील लोक आपला जीव मुठीत घेऊन सध्या वास्तव्य करत आहेत. तरी लवकरात लवकर हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे. काही जिवित हानी झाल्यास यास प्रशासनास जबाबदार धरले जाही.  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची पूर्तता लवकरात लवकर करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button