breaking-newsआंतरराष्टीयक्रिडा

लाहोरच्या रस्त्यांवर अवतरला ‘विराट’, काय आहे या व्हायरल फोटोमागचं रहस्य?

पाकिस्तानातल्या  लाहोरमधला एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. हा फोटो विराट आणि क्रमांक १८ जर्सीवर लिहिलेल्या एका माणसाचा आहे. या फोटोमुळे लाहोरच्या रस्त्यांवर विराट अवतरला आहे की काय? अशीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. बाईकवरून जाणाऱ्या आणि विराट असं लिहिलेली जर्सी घातलेल्या या माणसाचा पाठमोरा फोटो व्हायरल होतो आहे. ज्यामुळे पाकिस्तानातली विराट कोहलीचे चाहते आहेत ही बाब समोर आली आहे.

आठवडाभरापूर्वीच पाकिस्तान संघाचा माजी कप्तान युनिस खान याने विराट कोहलीची स्तुती केली होती. लंडन येथील एका कार्यक्रमात युनिस खान म्हटला होता की भारतीय संघाचा कप्तान विराट कोहलीचे चाहते भारताप्रमाणेच पाकिस्तानातही आहेत. त्याचाच प्रत्यय या व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे येतो आहे.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter
446 people are talking about this

युनिस खान याने जे वक्तव्य केले ते खरे ठरताना दिसते आहे. विराट आणि त्याचा क्रमांक १८ असलेली जर्सी घालून फिरणाऱ्या एका माणसाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा फोटो रिट्विटही केला आहे. आपल्याला ठाऊक आहेच की विराट कोहली हा विराट आणि क्रमांक १८ असं लिहिलेली जर्सी घालतो. तसंच नाव आणि क्रमांक असलेली जर्सी घालून हा माणूस लाहोरच्या रस्त्यांवरून फिरतो आहे. हा माणूस कोण आहे? त्याचे नाव काय? हे समजू शकलेले नाही. मात्र बाईकवर विराटची जर्सी घालून फिरणाऱ्या या पाठमोऱ्या माणसाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

विराट कोहलीने रविवारी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात ७७ चेंडुंमध्ये ८२ धावा केल्या होत्या. भारताने ३५२ धावांचा जो डोंगर ऑस्ट्रेलियापुढे रचला त्यामध्ये विराटची ही खेळी शिखर धवन इतकीच महत्त्वाची ठरली. आता येत्या रविवारी म्हणजेच १६ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगतो आहे. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले हे संघ विश्वचषकातला सामना खेळणार आहेत. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर आता विराट असे लिहेली जर्सी घातलेला लाहोरच्या रस्त्यांवरचा फोटो चांगलाच व्हायरल होतो आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button