breaking-newsराष्ट्रिय

लालू प्रसाद यादव यांना अंतरीम जामीन मंजूर

रांची- राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरीम जामीन मंजूर केला आहे. चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या लालू यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने त्यांना सहा आठवड्यांचा जामीन दिला आहे.

न्यायाधीश अपरेश कुमार यांनी आज वैद्यकीय कारणांसाठी हा जामीन दिला आहे. तत्पूर्वी, गुरुवारी लालूंना मुलगा तेजप्रताप यादवच्या लग्नासाठी पॅरोल मंजूर करण्यात आला होता. तेज प्रताप यादव याचा 12 मे रोजी विवाहसोहळा पार पडणार आहे. पक्षाच्या आमदार चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या राय हिच्यासोबत तेज प्रताप यादव लग्नगाठ बांधणार आहे. पाटणा येथे हा विवाहसोहळा पार पडेल.

लालू प्रसाद यादव गुरुवारी पाटणामध्ये पोहोचले असून कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. स्वागतासाठी त्यांची मुलगी आणि राज्यसभा खासदार मिसा भारतीसहित दोन्ही मुले तेजप्रताप आणि तेजस्वी यादव पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत उपस्थित होते. लालूंचे एखाद्या हिरोप्रमाणे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या नावे जोरदार घोषणाबाजी सुरु होती. चारा घोटाळ्यातील तीन प्रकरणांमध्ये लालूंना दोषी ठरवण्यात आले असून शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, लालूंना बिरसा मुंडा कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना रांचीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लालूंवर एम्स रुग्णालयातही उपचार करण्यात आले. नंतर तिथून पुन्हा त्यांना रांचीला पाठवण्यात आले. मुलाच्या लग्नासाठी उपस्थित राहणारे लालू यादव यांना 17 एप्रिलला साखरपुड्याला हजेरी लावणे शक्‍य झाले नव्हते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button