breaking-newsपुणे

लष्करी जवानाची धावत्या रेल्वेखाली उडून घेऊन आत्महत्या

पुणे –  दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका लष्करी जवानाचा मृतदेह घोरपडी येथे रेल्वे टॅकवर सापडल्याने खळबळ उडाली आहे. या जवानाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आल्याची माहिती मुंढवा पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रमेश एस. (वय २८) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असून ते मूळचे तामिळनाडू येथील रहिवासी आहेत. पुण्यातील घोरपडी येथील लष्कराच्या ग्रुपमधील थ्री सिग्नल विभागात ते अकाऊंट सेक्शनेमध्ये कामाला होते. ते बेपत्ता झाल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वी पोलिसांकडे नोंदवण्यात आली होती. त्यानुसार तपास करण्यात येत होता.

मात्र, आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बी. टी. कवडे रोड येथील दौंडच्या बाजूला जाणाऱ्या रेल्वेलाईनच्या शेजारी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्या जवानाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. माझ्या मृत्यूनंतर मिळणारे पैसे हे ठराविक नातेवाईकाना देण्यात यावे असा उल्लेख त्यात आहे. मात्र, आत्महत्येचे कारण त्यांनी लिहीलेले नाही. त्यामुळे नेमके कोणत्या कारणामुळे जवानांने हे पाऊल उचलले, याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button