breaking-newsक्रिडा

ललित मोदीच्या पत्नीचे निधन, ट्विटरवरून दिली माहिती

आयपीएल प्रकरणात फरार असणारा ललित मोदीची पत्नी मिनल मोदी हिचे लंडनमध्ये निधन झाले. ललित मोदीने भावनिक ट्विट करुन या संदर्भातील महिती दिली. मिनलचे दोन फोटो ट्विट करत तिला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आपल्या पत्नीच्या मृत्यूबद्दल लिहीलेल्या भावनिक पोस्टमध्ये ललित मोदी म्हणतो, ‘तू माझं प्रेम होती, जीवन होती आणि सहचारीणीही होतीस. तुला आता आमच्याकडे पाहत असशील. तूच माझे आयुष्य होतीस आणि प्रवासही होतीस. तुला दिलेले वचन मी नक्की पूर्ण करेन. आपल्या मुलांची काळजी घेईल, त्यांचे पालनपोषण नीट करेल. त्यांच्यावर प्रेम करेल आणि या सर्वांत तू माझ्याबरोबर असशील हे मला ठाऊक आहे. पण हे सर्व कठीण असेल.’

Lalit Kumar Modi

@LalitKModi

1/2 My Love My Life My Soulmate. You are finally at Peace and I am sure you will be watching over us. You have been my life and my journey and now I must continue as promised to you in ensuring our children are protected and nurtured and loved and I know you will always be there.

21 people are talking about this

Lalit Kumar Modi

@LalitKModi

But my love it will be tough. But you have taught us to be tough. I love you with all my heart and ….😢😢😢💔😢😢😢 09-06-1954 – 10-12-2018 😢 rest in peace now my jaan

105 people are talking about this

हाच फोटो मोदीने आपला ट्विटवरील प्रोफाइल फोटो म्हणून ठेवला आहे. मिनल मोदी ६४ वर्षांची होती. ललित मोदीने पत्नीच्या मृत्यूचे कारण ट्विटमध्ये स्पष्ट केले नसले तरी मागील अनेक वर्षांपासून मिनल कर्करोगाने ग्रस्त होती. आयपीएलमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी ललित मोदी मागील आठ वर्षांपासून भारतामधून फरार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button