breaking-newsराष्ट्रिय

लखनऊ-आगरा एक्स्प्रेस वे; नऊ विद्यार्थ्यांना बसने चिरडले, सात जणांचा मृत्यू

कन्नोज: उत्तर प्रदेशच्या लखनऊ-आगरा एक्प्रेस वेवर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. कन्नोज येथे सकाळी झालेल्या अपघातात बसने नऊ शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडले. यामध्ये सहा विद्यार्थी व एका शिक्षकाचा मृत्यू झाला असून दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

बसमधील डिझेल संपले असल्याने विद्यार्थ्यांची बस थांबली होती. यावेळी एका बसने विद्यार्थ्यांना चिरडले ज्यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बस चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना दोन लाख रूपये व जखमींना 50 हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button