breaking-newsमनोरंजन

लंडन फेस्टिव्हलमध्ये सईचा जलवा

लंडनमध्ये सई ताम्हणकरच्या “लव्ह सोनिया’चा नुकताच प्रिमीयर झाला. सईच्या “लव्ह सोनिया’ची लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून निवड झाली होती. सई ताम्हणकर फेस्टिव्हलच्या ओपनिंग सेरेमनीला रेड कार्पेटवर झाराच्या आउटफिटमध्ये आली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

सई ताम्हणकर मराठी फिल्म इंडस्ट्रीतील पहिली अभिनेत्री आहे, जिला लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर वॉक करायचा मान मिळाला. सईसोबत राजकुमार राव, मृणाल ठाकूर, मनोज बाजपेयी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक तबरेज नुरानी सुध्दा रेड कार्पेटवर दिसून आले.

सई इंटरनॅशनल मीडियाशी बोलताना म्हणाली, आजवरच्या माझ्या प्रवासात बरेच चढ-उतार आले. पण या क्षणी मागे वळून पाहताना त्या चढ-उतारांचे चीज झाल्याचे दिसते आहे. या चित्रपटाने मला जास्त सतर्क आणि संवेदनशील बनवले. प्रत्येकाने हा चित्रपट पहावा असे मला वाटते. ह्या चित्रपटातील कथानक हृदयस्पर्शी असून या सुंदर इंडो-वेस्टर्न चित्रपटाचा मी एक हिस्सा असल्याचा आणि हा चित्रपट लंडन इंडरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा भाग असल्याचा मला अभिमान आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button